कर्नाटकात कांद्याला 624 रुपये हमीभाव

वृत्तसंस्था
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

बेळगाव - दर गडगडल्याने संकटात सापडलेल्या कांदा उत्पादकांच्या मदतीला कर्नाटक सरकार धावून आले असून, सर्व प्रकारच्या कांद्यांसाठी प्रतिक्‍विंटल 624 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. आजपासून बेळगावसह आठ जिल्ह्यांत खरेदी केंद्रे सुरू करण्याची सूचना देण्यात आली आहे. यासाठी 50 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

कांदा कापणीला पाच ते सहा आठवड्यांपासून सुरवात झाली आहे. यंदा कांद्याला दर मिळेनासा झाल्याने शेतकरी संकटात सापडले होते. शेजारील महाराष्ट्रातही हीच परिस्थिती असल्याने राज्य सरकारने केंद्राकडून मदतीची अपेक्षा केली होती; मात्र केंद्राकडून तसे कोणतेच ठोस आश्‍वासन न मिळाल्याने कायदा आणि संसदीय व्यवहारमंत्री टी. बी. जयचंद्र यांनी उपसमितीची बैठक घेऊन त्वरित खरेदी केंद्रे सुरू करण्याचा आदेश दिला.
कांदा पिकवण्यात येणाऱ्या आठ जिल्ह्यांत भाव गडगडला आहे. इतर जिल्ह्यांतही कांदा पिकवण्यात येत असला तरी दर स्थिर आहेत. आवश्‍यकतेनुसार त्या ठिकाणीही केंद्रे सुरू करण्यात येतील. कांद्याला विशिष्ट दर्जा दिलेला नाही. त्यामुळे खरेदी केंद्रात शेतकरी कोणत्याही प्रकारचा कांदा घेऊन आला, तर त्याची हमीभावाने खरेदीची सूचना देण्यात आली आहे. सध्या बाजारात भाव गडगडल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा पिकाची कापणी केलेली नाही. शेतातच कांदा पडून आहे. हमीभाव जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांना संकटातून बाहेर येण्यास मदत मिळणार आहे. बेळगाव, धारवाड, दावणगेरे, गदग, हावेरी, चिकमंगळूरसह आठ जिल्ह्यांत प्रत्येकी एक खरेदी केंद्र सुरू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. मागणीनुसार केंद्रांची संख्या वाढविण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे.

Web Title: Onion confirm rate is Rs. 64 in Karnataka