कांद्याचे उत्पादन यंदा घटण्याचा अंदाज 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली-   यंदाच्या वर्षात म्हणजेच 2016-17 च्या हंगामात देशभरात कांद्याचे उत्पादन घटणार असल्याचा सरकारचा अंदाज आहे. 2015-16 च्या अंतिम अंदाजानुसार कांद्याचे उत्पादन 2.09 कोटी टन असेल. परंतु, यंदा ते 1.97 कोटी टन होईल. गेल्या वर्षीच्या म्हणजेच 2015-16 च्या तुलनेत सहा टक्के कमी आहे. परंतु मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत पाच टक्के अधिक आहे. 

फलोत्पादन आणि भाजीपाला लागवडीचा 2015-16 चा अंतिम अंदाज आणि 2016-17 चा प्राथमिक अंदाज कृषी मंत्रालयाने नुकताच जाहीर केला. एकूण लागवड क्षेत्र आणि उत्पादनाचा 2015-16 मधील अंतिम अंदाज अनुक्रमे 24472 हेक्‍टर आणि 28.6 कोटी मेट्रिक टन एवढा आहे. 2016-17 मधील पहिला सुधारित अंदाज पाहता लागवड क्षेत्र 24369 हेक्‍टर असे अल्पप्रमाणात घटले आहे. मात्र उत्पादन वाढेल असा अंदाज आहे. या प्राथमिक अंदाजानुसार फळे आणि भाज्यांचे उत्पादन 28.73 कोटी मेट्रिक टन होईल. 2016-17 मध्ये कांद्याचे उत्पादन 1.97 कोटी टन होईल असा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या म्हणजेच 2015-16 च्या तुलनेत सहा टक्के कमी आहे. परंतु मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत पाच टक्के अधिक आहे. 2015-16 मध्ये कांद्याचे उत्पादन 2.09 कोटी टन असून त्याआधीच्या म्हणजेच 2014-15 च्या तुलनेत हे उत्पादन 11 टक्‍क्‍यांनी अधिक आहे. परंतु, बटाट्याचे उत्पादन यंदाच्या वर्षात 4.39 कोटी टन राहणार असून गेल्यावर्षीच्या (2015-16) 4.34 कोटी टनांपेक्षा एक टक्‍क्‍याने अधिक आहे. हीच परिस्थिती टोमॅटोबाबतही असेल. टोमॅटो उत्पादन 1.89 कोटी टन असेल. 

Web Title: onion market rate