पुलवामा चकमकीत एकच दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
रविवार, 1 जुलै 2018

पुलवामा जिल्ह्यातील चकमकीत लष्करे तय्यबाचे तीन पैकी एकच दहशतवादी मारला गेल्याचे आज जम्मू काश्‍मीर पोलिसांनी स्पष्ट केले. तपासणीदरम्यान अन्य दोन दहशतवाद्यांचे मृतदेह न सापडल्याने ते पळून गेल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. 

श्रीनगर : पुलवामा जिल्ह्यातील चकमकीत लष्करे तय्यबाचे तीन पैकी एकच दहशतवादी मारला गेल्याचे आज जम्मू काश्‍मीर पोलिसांनी स्पष्ट केले. तपासणीदरम्यान अन्य दोन दहशतवाद्यांचे मृतदेह न सापडल्याने ते पळून गेल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. 

काल सायंकाळी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर थामुना गावात संशयित घरावर सुरक्षा दलाच्या जवानांनी कारवाई केली. या कारवाईत तीन दहशतवादी मारले गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, आज सकाळी तपासणीदरम्यान एकाच दहशतवाद्याचा मृतदेह आढळून आला. मृत दहशतवाद्याची ओळख पटली असून सज्जाद अहमद शाह असे नाव असून, तो उत्तर काश्‍मिरातील गुंड येथील चौघूल भागातील रहिवासी आहे. तो अनेक घातपाती कारवायात सक्रिय होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. थामुना गावात झालेल्या चकमकीत शस्त्रसाठा जप्त केल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: Only 1 terrorist killed in Pulwama encounter