राष्ट्रवादबाबत भागवत यांचे मोठे विधान; म्हणाले...

वृत्तसंस्था
Thursday, 20 February 2020

- जगासमोर सध्या अनेक मोठी आव्हानं आहेत. 

- राष्ट्रवादासारख्या शब्दांचा वापर नको

रांची : आपण राष्ट्रवादसारख्या शब्दांचा वापर करायला नको. याचा अर्थ नाझी किंवा हिटलरशी जोडला जाऊ शकतो. अशावेळी राष्ट्र किंवा राष्ट्रीय यांसारख्या शब्दांचा प्रामुख्याने वापर करायला हवा, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रांची येथे आयोजित एका कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. भागवत यांनी 'आरएसएस'चा विस्तार देशासाठी आहे. आमचे उद्दिष्ट भारताला विश्वगुरू बनवण्याचे आहे. हिंदूत्त्वच्या अजेंड्यावर आरएसएस काम करेल. तसेच जगासमोर सध्या अनेक मोठी आव्हानं आहेत. आता राष्ट्रवादासारख्या शब्दांचा वापर नको. पण त्याऐवजी राष्ट्र किंवा राष्ट्रीय यांसारख्या शब्दांचा प्रामुख्याने वापर व्हायला हवा. 

तसेच ते पुढे म्हणाले, जगासमोर ज्या काही समस्या आहेत, त्यांच्यापासून केवळ भारतच मुक्तता देऊ शकतो. भारताला जगाचे नेतृत्व करण्याचा विचार करायला हवा. देशाची एकता हीच खरी ताकद आहे.

दोन महिन्यात दुसरं द्विशतक, हा तर बापासारखाच जबरदस्त फलंदाज निघाला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only India has solution to tackle radicalism says Mohan Bhagwat