मुस्लिम दहशतवादीच कसे पळतात?: दिग्विजयसिंह

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - भोपाळ मध्यवर्ती तुरुंगातून पळून गेलेले आठ दहशतवादी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाल्याच्या घटनेवर कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी "हिंदू दहशतवादी पळून न जाता फक्त सीमीचे मुस्लिम दहशतवादीच कसे पळून जातात?' असे म्हणत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.

नवी दिल्ली - भोपाळ मध्यवर्ती तुरुंगातून पळून गेलेले आठ दहशतवादी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाल्याच्या घटनेवर कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी "हिंदू दहशतवादी पळून न जाता फक्त सीमीचे मुस्लिम दहशतवादीच कसे पळून जातात?' असे म्हणत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.

दिवाळीतील धामधुमीचा लाभ घेत भोपाळच्या मध्यवर्ती तुरुंगात असलेले सीमीचे आठ दहशतवादी रविवारी तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर भोपाळपासून 10 किलोमीटर अंतरावर मध्य प्रदेश पोलिसांनी या आठही अतिरेक्‍यांना घेरले आणि त्यात ते सर्वजण ठार झाले. या पार्श्‍वभूमीवर दिग्विजयसिंह यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्त्वाखालील मध्य प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे. "सीमी'चे दहशतवादी पळून जाण्याबाबतची गोपनीय माहिती असतानाही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची टीका दिग्विजयसिंह यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाची सत्य लपवून न ठेवता राष्ट्रीय सुरक्षा संस्थेकडून (एनआयए) किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाकडून सविस्तर चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच 'मी जर काही चूक बोलत असेल तर भारतीय जनता पक्षाने माझ्यावर कारवाई करावे', असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिग्विजयसिंह यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, "दिग्विजयसिंह यांनी अलिकडेच बाटला हाऊस चकमकीबद्दल प्रश्‍न उपस्थित केले होते आणि सोनिया गांधी यांनी त्यावेळी ही पक्षाची भूमिका नसल्याचे म्हटले होते.' तसेच 'आता मला सोनिया गांधी यांना विचारावेसे वाटते की दिग्विजयसिंह जे बोलत आहेत ती कॉंग्रेसची भूमिका आहे का?', असे म्हटले आहे.

Web Title: Only muslims break prisons and not hindus, asks Digvijay Singh