धारवाड उड्डाण पुल वाहतुकीसाठी खुला करा - सिटीझन कौन्सिल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

पूल खुला करण्याबाबत संबधित अधिकाऱ्यांशी चर्चा करु, अशी माहिती प्रादेशिक आयुक्त पी. ए. मेघण्णवर यांनी दिली. 

बेळगाव - उद्‌घाटनाची औपचारिकता नंतर पार पाडा, पहिल्यांदा जुन्या पुणे-धारवाड रोडवरील रेल्वे उड्डाण पूलावरील वाहतुकीला मार्ग खुला करण्याची मागणी बेळगाव सिटीझन कौन्सिलच्या शिष्ठमंडळातर्फे आज (ता. 3) प्रादेशिक आयुक्त मेघण्णवर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. पूल खुला करण्याबाबत संबधित अधिकाऱ्यांशी चर्चा करु, अशी माहिती प्रादेशिक आयुक्त पी. ए. मेघण्णवर यांनी दिली. 

जुन्या पुणे धारवाड रोडवर रेल्वे उड्डाण पुलाचे काम झाले आहे. वाहतुकीसाठी पूल खुला करण्यास काही हरकत नाही. निर्णय घेऊन पूल खुला करण्याची मागणी करण्यात आली. मेघण्णवर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्हाधिकारी व रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करु, असे सांगितले. कपिलेश्‍वर रेल्वे उड्डाण पुलावर वाहतुकीचा ताण वाढतो आहे. पर्याय जुना धारवाड रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाचे काम झाल्यानंतर गोगटे सर्कल रेल्वे उड्डाण पूलाचे काम हाती घेण्याची मागणी होती. पण, त्याची दखल घेतली नाही. दोन्ही पूल एकाचवेळी सुरु केले. शहरातील वाहतुकीवर ताण वाढला आहे. शहरामध्ये वेढा घालून प्रवास करणे भाग पडत आहे. पर्याय उपलब्ध नसल्यामुळे इतके दिवस कपिलेश्‍वर उड्डाण पुलाचा आधार घेतला. पण, आता धारवाड रोडवरील पुलाचे काम झाले आहे. शहरामधील दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी खुला करण्यास काय हरकत आहे. उद्‌घाटनाचा कार्यक्रमानंतर उरकला जावा, अशी मागणी सिटीझन कौन्सिलचे सतीश तेंडूलकर यांनी केलेली. बसवराज जवळी, शेवंतीलाल शहा, विकास कलघटगी, अरुण कुलकर्णी उपस्थित होते. 

आचारसंहितेच्या कचाट्यात 
धारवाड पुलाचे काम पूर्ण झाले आहे. पुलाच्या उद्‌घाटनाला आचारसंहिता अडचणीची ठरली आहे. त्यासाठी पूल वाहतुकीसाठी खुला करून द्यायचा किंवा निवणुकीनंतर पुलाचे उद्‌घाटन करायचे, त्याबद्दल विचार करत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

Web Title: Open Dharwad flight bridge for traffic says citizen council