
'ऑपरेशन सिंदूर' बद्दल सोशल मीडिया पोस्ट केल्याबद्दल हरियाणाच्या सोनीपत येथील अशोका विद्यापीठाच्या एका सहयोगी प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. आरोपी प्राध्यापकाचे नाव अली खान महमूदाबाद आहे. पोलिसांनी सांगितले की, भाजप युवा मोर्चाच्या नेत्याच्या तक्रारीवरून अशोका विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांच्यावर कारवाई करण्यात आली.