बेळगावात पिकाऊ जमिनीतून सांडपाणी प्रकल्पास विरोध

मिलिंद देसाई
सोमवार, 9 एप्रिल 2018

बेळगाव : येळ्ळुर रोड येथील बळ्ळारी नाल्याशेजारी असणाऱ्या पिकाऊ शेतजमिनीतून सांडपाणी प्रकल्पाच्या पाईप घालण्याचा अट्टाहास प्रशासनाने चालविला आहे. शेतकऱ्यांना विश्‍वासात न घेता शेतामधुन पाईप घालण्यासाठी मार्किंग करण्यात आले असुन पाईप शेतामध्ये टाकण्यात आले आहेत त्यामुळे शेतकरी वर्गातुन नाराजी व्यक्‍त होत आहे. तसेच मार्किंग करतेवेळी कोणत्या कारणास्तव पाईप घालण्यात येणार आहेत याची माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकरी वर्गाने काम बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. 

प्रशासनाकडुन विविध कारणांमुळे शेतकरी वर्गाला त्रास देण्याचा प्रयत्न सुरुच असुन सुपिक जमिनीमधुन रस्ता करने, हलगा मच्छे बायपास रस्ता कामाचे भुमी पुजन करने आदी प्रकार सुरु असतानाच आता बळ्ळारी नाल्या शेजारील जागेमधुन मोठया आकारातील पाईप घालण्याकरीता मार्किंग करण्यात आले आहे शनिवारी सायंकाळी शेतात मार्किंग करण्यात आले आहे तर रविवारी काही प्रमाणात पाईप आणुन टाकण्यात आले आहेत पाईप आणुन टाकण्यात आल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी कोणत्या कारणास्तव पाईप आणुन टाकले आहेत याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु माहिती उपलब्ध होत नाही आहे त्यामुळे शेतकरी वर्गात संभ्रमावस्थेत अडकले आहेत.

Web Title: Oppose to Sewage water project from productive land