राष्ट्रपतीपदासाठी विरोधीपक्षांचा असेल एकच उमेदवार, पवारांनंतर नव्या नावाची चर्चा

दिल्लीत विरोधीपक्षांची बैठक पार पडली. यामध्ये काँग्रेससह १७ पक्षांनी सहभाग घेतला. यामध्ये हा ठराव करण्यात आला.
Opposition Parties
Opposition Parties

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाची उमेदवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाकारल्यानंतर आता विरोधीपक्षांकडून दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. पण ही व्यक्ती सर्व विरोधीपक्षांच्या संमतीनं निवडण्यात येणार आहे. दिल्लीत आज विरोधी पक्षांची बैठक पार पडली. यामध्ये काँग्रेससह १७ पक्षांनी सहभाग घेतला. यामध्ये हा ठराव करण्यात आला. (Opposition leaders adopt resolution to field common candidate in Presidential election)

यावर बोलताना सुधींद्र कुलकर्णी म्हणाले, विरोधीपक्षांनी ठराव केला की, आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्वांच्या सहमतीनं एकच उमेदवार देण्यात येईल. राष्ट्रपतीपदासाठीचा हा उमेदवार संविधानाचा संरक्षक म्हणून काम करेल. तसेच मोदी सरकारला भारतीय लोकशाही आणि भारताच्या सामाजिक बांधणीचं आणखी नुकसान करण्यापासून रोखू शकेल.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, या बैठकीला अनेक विरोधीपक्ष एकत्र आले आहेत. आम्ही ठरवलंय की एकमतानं उमेदवार निवडायचा. प्रत्येकजण या उमेदवाराला आपलं समर्थन देईल. आम्ही इतरांशीही याबाबत चर्चा करु. ही चांगली सुरुवात आहे. अनेक महिन्यांनंतर आम्ही एकत्र चर्चेसाठी बसलो आहोत आणि आम्ही पुन्हा एशा बैठका आम्ही करु. आम्ही सर्वांनी शरद पवारांचं नाव घेतलं पण त्यांनी याला नकार दिला. आम्ही त्यांना यावर पुनर्विचार करायला सांगितलं आहे, पण त्यांचा नकार कायम राहिला तर नव्या व्यक्तीचा विचार केला जाईल.

Opposition Parties
मुंबई महापालिकेत रामराज्य आणण्याचा प्रयत्न करणार - आदित्य ठाकरे

तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या या विरोधीपक्षांच्या बैठकीत १७ राजकीय पक्षांनी सहभाग नोंदवला. यामध्ये काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते. तर आम आदमी पार्टी, तेलंगाणा राष्ट्र समिती, बिजू जनता दल हे या बैठकीपासून दूर राहिले. तर शिवसेना, भाकपा, माकपा, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, राष्ट्रीय लोकदल, झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षांचे नेते या बैठकीत सामिल झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com