विरोधक आता आर्थिक मुद्द्यांवर आवाज उठविणार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

अर्थव्यवस्थेतील घसरण आणि दिवसेंदिवस बिघडत चाललेली आर्थिक परिस्थिती, सामान्य माणसाची हलाखीची परिस्थिती, शेती व शेतकऱ्यांवर आलेले संकट या आर्थिक मुद्द्यांवर व्यापक एकजूट करून संसदेत व संसदेबाहेर संयुक्तपणे आवाज उठविण्याच्या मुद्द्यावर आज दहा विरोधी पक्षांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेतील घसरण आणि दिवसेंदिवस बिघडत चाललेली आर्थिक परिस्थिती, सामान्य माणसाची हलाखीची परिस्थिती, शेती व शेतकऱ्यांवर आलेले संकट या आर्थिक मुद्द्यांवर व्यापक एकजूट करून संसदेत व संसदेबाहेर संयुक्तपणे आवाज उठविण्याच्या मुद्द्यावर आज दहा विरोधी पक्षांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या सरकारविरोधी आंदोलनाची निश्‍चित रूपरेषा लवकरच ठरविण्यात येईल, असे या विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

समविचारी राजकीय पक्षांच्या साथीने सरकारच्या आर्थिक धोरणांविरुध्द आवाज उठविणे हा या बैठकीचा हेतु होता. या बैठकीत काँग्रेसशिवाय द्रमुक, राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँग्रेस, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, शरद यादव, उपेद्र कुशवाहा, केरळ काँग्रेस या पक्षाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसलाही या बैठकीचे निमंत्रण होते. बैठकीबाबत माहिती देताना काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी राष्ट्रीय पातळीवर सरकारच्या आर्थिक धोरणांविरुद्ध व्यापक आघाडी उभारण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition party economic issue discussion parliament