'यूपीए'कडून उपराष्ट्रपतीपदासाठी गोपाळकृष्ण गांधींना उमेदवारी

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जुलै 2017

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार घोषित करण्यासाठी आयोजित बैठकीत जनता दल युनायटेडचे (जदयू) शरद यादव उपस्थित होते. सोनिया गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, तृणमुल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन, सीपीआयचे (एम) सिताराम येचुरी, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे नरेश अग्रवाल आणि बसपचे सतीशचंद्र मिश्रा उपस्थित होते.

नवी दिल्ली - काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीने (यूपीए) उपराष्ट्रपतीपदासाठी महात्मा गांधींचे नातू व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 18 विरोधी पक्षांशी चर्चा करून गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावाची आज (मंगळवार) घोषणा केली. विरोधी पक्षांच्या चर्चेदरम्यान फक्त गांधी यांच्या नावावरच चर्चा करण्यात आली. यूपीएने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मीरा कुमार यांना संधी दिली आहे. मीरा कुमार आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) रामनाथ कोविंद यांच्यात लढत होणार आहे. एनडीएने अद्याप उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार जाहीर केलेला नाही.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार घोषित करण्यासाठी आयोजित बैठकीत जनता दल युनायटेडचे (जदयू) शरद यादव उपस्थित होते. सोनिया गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, तृणमुल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन, सीपीआयचे (एम) सिताराम येचुरी, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे नरेश अग्रवाल आणि बसपचे सतीशचंद्र मिश्रा उपस्थित होते. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 5 ऑगस्टला होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: Opposition picks Gopalkrishna Gandhi as its pick for Vice-President