विरोधक आणणार मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जुलै 2018

''आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा मुद्दा प्रामुख्याने घेतला जाणार जाणार आहे. त्यामुळे जनतेच्या समस्या सभागृहात उपस्थित करण्याची आम्हाला संधी मिळेल, अशी आशा आम्ही करतो''.

-  मल्लिकार्जुन खरगे, नेते, काँग्रेस, लोकसभा.

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (ता.18) सुरु होत आहे. या पावसाळी अधिवेशात सर्व विरोधीपक्ष एकत्र येणार असून, मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज (मंगळवार) दिली. 

खरगे यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, काल (सोमवार) झालेल्या विरोधीपक्षांच्या बैठकीत सहभागी झालेले सर्व पक्ष अविश्वास प्रस्ताव आणण्याबाबत सहमत झाले आहेत. सर्वच विरोधीपक्ष एकत्र यावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अविश्वास प्रस्तावात महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, शेतकऱ्यांची परिस्थिती यांसारख्या महत्वपूर्ण बाबींचा समावेश केला जाणार आहे.

तसेच आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा मुद्दा प्रामुख्याने घेतला जाणार जाणार आहे. त्यामुळे जनतेच्या समस्या सभागृहात उपस्थित करण्याची आम्हाला संधी मिळेल, अशी आशा आम्ही करतो, असेही ते म्हणाले.

दरम्यान, निवडणुकांपूर्वी देण्यात आलेल्या जाहीरनाम्यातील एकही आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही. जमावाकडून हत्यांसारख्या घटना घडतात. असे असताना मात्र, मंत्री याचे समर्थनही करतात. हा मुद्दा आम्ही सभागृहात मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही खरगे म्हणाले. 

Web Title: Opposition will Present non confidence motion against Modi government