कुमारस्वामींच्या शपथविधीदरम्यान विरोधकांचे शक्तिप्रदर्शन

वृत्तसंस्था
बुधवार, 23 मे 2018

बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांचा शपथविधी सोहळा आज (बुधवार) पार पडला. त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपविरोधी पक्षांनी मोट बांधली. शपथविधी सोहळ्यानंतर प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

राज्यपाल वजूभाई वाला यांनी कुमारस्वामी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. कुमारस्वामी यांच्यासह जी. परमेश्वर यांनाही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यांचा हा शपथविधी सोहळा विधानसौंध येथे पार पडला. यावेळी माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) नेते एच. डी. देवेगौडा, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, शरद यादव यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.

या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातील प्रमुख 17 विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण पाठविण्यात आले होते. या निमंत्रणानुसार प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी उपस्थिती लावली. यावेळी विरोधकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यानंतर विरोधकांच्या चेहऱ्यावर एकप्रकारे विजयाचे चित्र पाहायला मिळाले.

Web Title: Oppositions power demonstration during Kumaraswamy swearing in