मुलीच्या पायाने नेटिझन्सला लावले वेड; खरं काय पाहा...

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

सोशल मीडियावर एका लहान मुलीच्या छायाचित्राने अनेकांना वेड लावले आहे. सोशल मीडियावर हे छायाचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, प्रथम अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

नवी दिल्ली : सोशल मीडियावर एका लहान मुलीच्या छायाचित्राने अनेकांना वेड लावले आहे. सोशल मीडियावर हे छायाचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, प्रथम अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चित्रामध्ये मुलीच्या पाय बारीक आणि लांब दिसत आहेत. यामुळे या मुलीचे पाय असे कसे असू शकतात बरं? असा प्रश्न अनेकांना पडला. पण, सत्य समजल्यानंतर खरी परिस्थिती समोर आली. पण, तोपर्यंत अनेकांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून वेगवेगळे अंदाज वर्तविले.

प्रथम छायाचित्र पाहिल्यानंतर असे वाटते की, या मुलीचे पाय खूप लांब व बारीक आहेत. मात्र, हे छायाचित्र जवळून पाहिल्यानंतर पॉपकॉर्नच्या पारदर्शक पॅकेटमुळे ही एक ऑप्टिकल इमेज तयार झाल्याचे दिसते. मुलीच्या हातात पॉपकार्न आहे. पॉपकार्नचे पिशवी हातात धरल्यामुळे त्याचा रंग व जमीनीचा रंग एकसारखा दिसत आहे. त्यामुळे प्रथम काहीच कळत नाही. हातातली पॉपकॉर्नची पिशवी पाहिल्यानंतर खरी परिस्थिती दसते व मुलीचे पाय लांब आणि बारीक का दिसत आहे, हे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: optical illusion image girl standing with bag of popcorn viral on social media