तोंडी तलाक अद्याप कायम - रविशंकर प्रसाद 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 जून 2018

"तोंडी तलाक'बाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन आणि लोकसभेने त्यासंबंधीचे विधेयक मंजूर केल्यानंतरदेखील तेलंगण आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये अद्याप ही प्रथा कायम असल्याचे केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.

हैदराबाद : "तोंडी तलाक'बाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन आणि लोकसभेने त्यासंबंधीचे विधेयक मंजूर केल्यानंतरदेखील तेलंगण आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये अद्याप ही प्रथा कायम असल्याचे केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. येथे पत्रकारांशी संवाद साधताना प्रसाद यांनी मागील सरकारच हवाईक्षेत्रातील भ्रष्टाचारास कारणीभूत असल्याचेही सांगितले.

"तोंडी तलाक'चा मुद्दा हा धर्म अथवा श्रद्धेशी निगडित नाही, तो लिंगसमानतेशी निगडित आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगणिस्तानसारख्या 22 इस्लामी देशांनी ही प्रथा बंद केली आहे, असेही त्यांनी नमूद केले. 
 

Web Title: Oral divorce still persists says Ravi Shankar Prasad