
Bageshwar Dham: पंडित धीरेंद्र शास्त्री यांना Y दर्जाची सुरक्षा, सरकारने जारी केला आदेश
Bageshwar Dham: वादग्रस्त वक्तव्य करणारे पंडित धीरेंद्र शास्त्री यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. मध्य प्रदेश सरकारच्या गृह मंत्रालयाने या संदर्भात आदेश जारी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून धीरेंद्र शास्त्री यांना सतत धमक्या मिळत होत्या आणि त्यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण होत होते. त्यामुळे मध्यप्रदेश सरकारने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी हिंदू राष्ट्राबद्दल वक्तव्य केले होते. तेव्हापासून त्यांच्या टीका होत आहे. त्यांच्या हिंदु राष्ट्र निर्माणच्या वक्तव्यावर अनेक संघटनांनी प्रश्न उपस्थित केले असून अनेक राजकीय पक्षव देखील त्यांच्यावर टीका करत आहेत.
यामुळे धीरेंद्र शास्त्री यांच्या समर्थकांकडून त्यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी सातत्याने केली जात होती. याच मागणीच्या आधारे मध्य प्रदेश सरकारने हा आदेश जारी केला आहे.
काय आहे Y दर्जाची सुरक्षा-
१ ते २ कमांडो आणि ८ पोलिसांचा वाय दर्जाच्या सुरक्षा श्रेणीत समावेश आहे. यासोबतच दोन पीएसओही (Protective Service Officer) सुरक्षेत तैनात असतील.