भोपाळ चकमकीची होणार न्यायालयीन चौकशी

पीटीआय
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

भोपाळ - भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेल्या दहशतवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आल्याच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले.

भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून सिमी या दहशतवादी संघटनेचे आठ दहशतवादी पळून गेले होते. त्यानंतर भोपाळपासून 10 किलोमीटर अंतरावर पोलिसांशी झालेल्या चकमकीत या सर्व दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. या चकमकीबद्दल विरोधकांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्याने मुख्यमंत्री चौहान यांनी या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले.

निवृत्त न्यायाधीश एस. के. पांडे यांच्या नेतृत्त्वाखालील न्यायालयीन आयोग या प्रकरणाची चौकशी करणार आहे. हा आयोग दहशतवादी तुरुंगातून कसे पळाले आणि नंतर झालेल्या चकमकीची चौकशी करणार आहे. गुरुवारी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला पाठविलेल्या नोटिशीमध्ये या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागविला आहे. चौहान यांनी अलीकडेच या प्रकरणाची राष्ट्रीय तपास संस्थेकडून चौकशी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. तर दुसरीकडे मध्य प्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी या प्रकरणाच्या चौकशीची गरज नसल्याचे वक्तव्य केले होते.

दोन ध्वनीफिती उजेडात
सिमी दशहतवाद्यांच्या चकमक प्रकरणात दोन ध्वनिफिती उजेडात आल्या आहेत. यामध्ये चकमकीदरम्यान पोलिस अधिकाऱ्यांची अन्य पोलिस कर्मचाऱ्यांशी झालेली चर्चा असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये पोलिस अधिकारी दहशतवाद्यांना घेरून ठार मारण्याच्या सूचना देत असल्याचे ऐकायला मिळत असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे.

महाष्ट्रातील कुटुंबाची तक्रार
पुणे - भोपाळमधील चकमकीत मारल्या गेलेल्या सिमीच्या आठ दहशतवाद्यांपैकी महाराष्ट्रातील खालिद अहमद मुचाले याच्या कुटुंबाने मध्य प्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह आणि पोलिस महासंचालकांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यासाठी पोलिसांत धाव घेतली. खालिदची आई मेहमूदा यांनी काल सोलापूरमधील एमआयडीसी पोलिस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल केला असून, माझ्या मुलाचा खून करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: Order of Judicial Enquiry of Bhopal incident