स्वत:च्या पत्नीचे तंदुरमध्ये तुकडे करणाऱ्याच्या सुटकेचे आदेश

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : पत्नीची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे करून तंदूर भट्टीत जाळणाऱ्या सुशील शर्माची शिक्षा भोगून झाली असल्याने त्याची तुरुंगातून तातडीने सुटका करा, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) दिले. 1995 मध्ये सुशील शर्माने त्याची पत्नी नैना सहानी हिची निर्घृण हत्या केली होती. 'हत्या प्रकरणामध्ये सुनावलेली शिक्षा पूर्णपणे भोगून झाल्यानंतरही त्या व्यक्तीस अनिश्‍चित काळासाठी तुरुंगात ठेऊ शकतो का', असा प्रश्‍न न्यायालयाने विचारला. 

सुशीलने पत्नी नैनावर विवाहबाह्य संबंधांचा आरोप केला होता. तो युवक कॉंग्रेसचा माजी नेता आहे. सध्या 56 वर्षांचा असलेल्या सुशीलने न्यायालयात याचिका दाखल केली होती. 'गुन्हेगाराने केलेला गुन्हा अत्यंत निर्घृण होता. त्याबद्दल त्याने 25 वर्षे तुरुंगात काढली आहेत. त्यासाठी कायद्याने असलेली शिक्षा त्याने भोगलेली आहे. त्यानंतरही गुन्हेगारास तुरुंगात डांबणे हा त्याच्या मानवाधिकारांचे उल्लंघन नाही का', असे मत न्यायालयाने नोंदविले. 

'अशाच प्रकारचा गुन्हा शर्मा पुन्हा करू शकेल, याची आता शक्‍यता नाही. तसेच, आता तो समाजासाठी धोकादायकही नाही', असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. त्यामुळे त्याची तुरुंगातून सुटका करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

काय झालं होतं त्या रात्री? 

2 जुलै, 1995 रोजी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलच्या भट्टीमध्ये शर्माने त्याच्या पत्नीचा मृतदेह जाळला. पोलिस हवालदार अब्दुल नाझीर कुंजू आणि चंदरपाल या दोघांच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली. मध्यरात्रीच्या सुमारास या हॉटेलच्या भट्टीतून धूर येत असल्याने या दोघांना संशय आला. त्यांनी चौकशी केल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. 

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर रेस्टॉरंटचा मॅनेजर केशव कुमार याने 'कॉंग्रेसची जुनी बॅनर्स जाळत आहोत' असा दावा केला; तर सुशील शर्मा पळून गेला. कॉंग्रेसचा कार्यकर्ता आणि वर्गमित्र मतलूब करिम याच्याशी नैनाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय शर्माला होता. एकेरात्री त्याने नैनावर गोळ्या झाडल्या. तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने स्वत:च्या हॉटेलमधील तंदूरमध्ये तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. आठ वर्षे पळ काढल्यानंतर शर्माने 7 नोव्हेंबर, 2003 रोजी पोलिसांसमोर शरणागती पत्करली.

Web Title: The order to release One Person who was Arrested