नया हिंदुस्तान बन रहा है भय्या- राहुल

वृत्तसंस्था
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

राम मनोहर लोहिया रुग्णालयात जवानाच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले असता दिल्ली पोलिसांकडून त्यांना गेटवरच रोखण्यात आले. 'नया हिंदुस्तान बन रहा है भय्या', अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली. 

नवी दिल्ली - वन रँक वन पेन्शन (ओआरओपी) प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या एका माजी सैनिकाने विष पिऊन आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरक्षा रक्षकांकडून रोखण्यात आले.

केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या ओआरओपी योजनेप्रकरणी माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल हे समाधानी नव्हते. ते सोमवारपासून आपल्या काही सहकाऱ्यांसोबत जंतर-मंतर येथे आंदोलन करत होते. मंगळवारी ते आपल्या सहकाऱ्यांसोबत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेण्यासाठी जात होते. पण, त्यापूर्वीच त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली. त्यांना तात्काळ राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आले. मात्र. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

आज (बुधवार) दुपारी राम मनोहर लोहिया रुग्णालयात जवानाच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले असता दिल्ली पोलिसांकडून त्यांना गेटवरच रोखण्यात आले. 'नया हिंदुस्तान बन रहा है भय्या', अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली. 

Web Title: OROP: Security personnel stopped Rahul Gandhi from entering RML Hospital to meet family of ex-serviceman