भारतात 25 हजार वर्षांपूर्वी होते शहामृग

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मार्च 2017

राजस्थान - न उडणारा पक्षी म्हणून शहामृग ओळखले जाते. शहामृगाचे मूळ आफ्रिकेत असले तरी, भारतात 25000 वर्षांपूर्वी शहामृग असल्याचे 'सेंटर फॉर सेल्युलर एँड मोलेक्युलर बायोलॉजी' (सीसीएमबी) या संस्थेने केलेल्या अभ्यासात लक्षात आले आहे.

संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक कुमारस्वामी थंगराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या विविध भागात शहामृगाचे अवशेष सापडले असले तरी, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी असे अवशेष आढळले आहेत. या अवशेषांचा अभ्यास केला असता, हे आफ्रिकेतील शहामृगासारखेच असल्याचे दिसून आले आहे.  

शहामृगाच्या अवशेषांची चाचणी केली असता हे अवशेष किमान 25 हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शहामृग

  •  शहामृग हा आफ्रिकेतील वाळवंटी प्रदेशात आढळतो
  •  शहामृगाचे खाद्य असलेल्या वनस्पतींमधूनच त्यांना  शरीरासाठी आवश्यक असलेले पाणी देखील मिळते
  •  शहामृगांना उडता येत नसले, तरी हा पक्षी ताशी 65  किमीपर्यंतच्या वेगाने धावू शकतो.
  •  धावताना दिशा बदलण्यासाठी शहामृग पंखांचा उपयोग  करू शकतात.
  •  शहामृगाचे पाय लांब आणि मजबूत असतात, त्यामुळे एका पावलात ते 10 ते 16 फूट अंतर ते कापू शकतात.
     
Web Title: Ostriches were found in India 25,000 years ago, claims study