आमचे कोणीच ऐकत नाही : सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

नवी दिल्ली: देशभरातील पोलिस दलात सुधारणा करण्यासंबंधीच्या याचिकेवर जलद सुनावणीस स्पष्टपणे नकार देत आज सर्वोच्च न्यायालयाने "आमचे कोणीच ऐकत नाही' त्यामुळे आम्ही यास नकार देत आहोत असे म्हटले आहे.

या याचिकेवर जलद सुनावणीची मागणी वकिलांनी केल्यानंतर सरन्यायाधीश जे. एस. खेहर, डी. वाय. चंद्रचुड आणि एस. के. कौल यांच्या खंडपीठाने ""माफ करा. आम्ही यास नकार देत आहोत,'' असे म्हटले.

वकील आणि दिल्ली भाजपचे प्रवक्ते अश्‍विनी कुमार उपाध्याय यांनी या याचिकेच्या जलद सुनावणीची मागणी केल्यानंतर पोलिस सुधारण्याची प्रक्रिया बऱ्याच वर्षांपासून सुरू असून, आमचे आदेश कोणीही ऐकत नाही, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. या याचिकेत पोलिस दलातील अनेक सुधारणांबाबत विचारणा करण्यात आली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठराविक कार्यकाल देण्याबाबतही विचार करावा असे म्हटले आहे.

Web Title: Our does not listen to: the Supreme Court