'येत्या 5 वर्षात राज्यात आमचेच सरकार' 

वृत्तसंस्था
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केडरचे माजी प्रमुख प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी आज अधिकृतपणे गाेवा सुरक्षा मंच या पक्षातून राजकारणात प्रवेश केला. यावेळी पक्षाच्या महामेळाव्यात त्यांच्या अध्य़क्षपदाची घोषणा करण्यात आली.
 

पणजी (गोवा) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केडरचे माजी प्रमुख प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी आज अधिकृतपणे गाेवा सुरक्षा मंच या पक्षातून राजकारणात प्रवेश केला. यावेळी पक्षाच्या महामेळाव्यात त्यांच्या अध्य़क्षपदाची घोषणा करण्यात आली.

महामेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यमान सरकारच्या प्रशासनावर सडकून टीका केली. येत्या 5 वर्षात गोवा सुरक्षा मंच गोव्यात सरकार स्थापन करील असे सांगितले. मंचतर्फे पुढील वर्षी  महासभा आयोजित करण्याचे ठरविले आहे. राज्यातील कोणत्याही निवडणुकीत शिवसेनेबरोबर गोसुमंची युती असल्याचे यावेळी घोषित करण्यात आले.

''मोबाईलवर बातम्या वाचण्यासाठी सकाळचे अॅप डाऊनलोड करा''

दरम्यान,  गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा आपणच चेहरा असल्याचेही त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

Web Title: Our government in the state in next 5 years