पर्यटकाच्या मृत्यूमुळे आमची मान शरमेने खाली - महबुबी मुफ्ती

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 मे 2018

फुटीरतावाद्यांनी सोमवारी येथे बंद पुकारला व श्रीनगर गुलमार्ग रस्त्यावरील पर्यटकांच्या गाड्यांना लक्ष्य केले. काही गाड्यांवर दगडफेक केली. या दगडफेकीत एका गाडीतील चेन्नईचा पर्यटक थिरूमनी हा दगड लागून जखमी झाला. स्थानिक रूग्णालयात त्याला दाखल करण्यात आले, पण उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीरमध्ये चालू असलेल्या चकमकीविरोधात स्थानिकांनी केलेल्या दगडफेकीत काल (ता. 7) एका निष्पाप पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. हा पर्यटक चेन्नईचा रहिवासी असून आर. थिरूमनी (वय 21) असे त्याचे नाव आहे.   

"Head Hangs In Shame": Mehbooba Mufti On Tourist Death In Stone-Throwing

सध्या जम्मू-काश्मिरमधील परिस्थिती पुन्हा पेटलेली असून, गोळीबार, दगडफेक आणि चकमकींना पुन्हा सुरवात झाली आहे. रविवारी सुरक्षा दलांनी हिज्बुल मुजाहिद्दीनच्या पाच दहशतवाद्यांना ठार केले. या चकमकीत हिज्बुलचा कमांडर सद्दाम पद्दर, काश्मीर विद्यापीठाचा सहाय्यक प्राध्यापक महंमद रफी भट व इतर तिघांचा समावेश होता. शनिवारी ही एक चकमक होऊन त्यात तीन दहशतवाद्यंना सुरक्षा दलाने कंठस्नान घातले होते. यामुळे सलग दोन दिवस चालणाऱ्या या चकमकीमुळे पुलवामा, शोपियाँ येथील स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले व त्यांनी दगडफेकीला सुरवात केली.   

फुटीरतावाद्यांनी सोमवारी येथे बंद पुकारला व श्रीनगर गुलमार्ग रस्त्यावरील पर्यटकांच्या गाड्यांना लक्ष्य केले. काही गाड्यांवर दगडफेक केली. या दगडफेकीत एका गाडीतील चेन्नईचा पर्यटक थिरूमनी हा दगड लागून जखमी झाला. स्थानिक रूग्णालयात त्याला दाखल करण्यात आले, पण उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी थिरूमनीच्या नातेवाईकांची भेट घेतली व सांत्वन केले.

'पर्यटकाच्या दगडफेकीत झालेल्या मृत्यूमुळे आमची मान शरमेने खाली गेली आहे. ही खूप दुःखद व मन हेलावून टाकणारी घटना आहे.' अशी भावना मुफ्ती यांनी व्यक्त केली.  

Web Title: our head Hangs In Shame said by mehbuba mufti