आमचीच सत्ता येईल आघाडीची गरजच नाही: शहा

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

वाराणसी: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपलाच पूर्ण बहुमत मिळेल. त्यामुळे निवडणुकीनंतर बहुजन समाज पक्ष अथवा अन्य कोणत्याही पक्षाशी आघाडी करण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे.

राज्यात उद्या (ता. 23) रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान होत असून, त्या पार्श्‍वभूमीवर शहा यांनी दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करणे टाळले आहे. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करणे हीच आमच्या निवडणुकीची रणनीती असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, अनेक वृत्तवाहिन्यांचे सर्वेक्षण आणि राजकीय विश्‍लेषकांनी केलेल्या भाकितांप्रमाणे या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उत्तर प्रदेश पिंजून काढणाऱ्या शहा यांनी विधानसभा निवडणुकीसाठीही जोरदार प्रचार केला होता. लोकसभेप्रमाणेच विधानसभेचे निकालही तितकेच महत्त्वपूर्ण ठरतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. याखेपेस भाजपसमोर समाजवादी पक्ष, कॉंग्रेस यांची आघाडी आणि बहुजन समाज पक्षाचे कडवे आव्हान आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने भाजपला कोणत्याही स्थितीत विजयी व्हावेच लागेल.

शहा म्हणाले

  • उत्तराखंड, गोव्यातही आमचेच सरकार येईल
  • पंजाबच्या निकालाबाबत भाष्य करणे कठीण
  • विजयी आमदारच "यूपी'चा मुख्यमंत्री निवडतील
  • समाजवादी पक्षामुळे राजकारणास जातीय रंग
  • कॉंग्रेसचे पंतप्रधान मोदींवरील आरोप निराधार
Web Title: Ourselves, but need not be the leading power: Shah