कपड्यांच्या दुकानात शिरली अनियंत्रित बाईक; व्हिडिओ पाहून व्हाल चकीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कपड्यांच्या दुकानात शिरली अनियंत्रित बाईक; व्हिडिओ पाहून व्हाल चकीत

कपड्यांच्या दुकानात शिरली अनियंत्रित बाईक; व्हिडिओ पाहून व्हाल चकीत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

चित्रविचित्र अपघातांचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. काही अपघात जीवघेणे असतात तर काही अगदी हास्यास्पद असतात. तेलंगनामधील एका साडीच्या दुकानात असाच एक अपघात घडलाय जो फारच विचित्र आहे. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. दुचाकीस्वाराचा संपूर्णपणे ताबा सुटलेली एक दुचाकी भरधाव वेगाने येते आणि ती साडीच्या दुकानात शिरते असा हा व्हिडीओ आहे. (Out of control motorcycle crashes into clothing store in Telangana)

हेही वाचा: गुजरातमध्ये 350 कोटींच्या ड्रग्जसह एकाला अटक; पाकिस्तान कनेक्शन?

अनपेक्षितपणे एखाद्या दुकानात याप्रकारे भरधाव दुचाकी शिरल्यानंतर काय अवस्था झाली असेल, याची कल्पना तुम्ही करु शकता. त्या दुकानातील ग्राहक अचानकपणे आलेल्या या दुचाकीमुळे दचकले आणि घाबरुन त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या स्टूलला येऊन ही दुचाकी धडकली त्या स्टूलवर निळ्या सलवारमधील एक बाई बसली होती. तिच्या जवळच दोन इतर ग्राहक देखील उभे होते.

हेही वाचा: एसटी संप चिघळणार, पडळकर आणि खोत यांचा आझाद मैदानावर मुक्काम

मात्र, या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याचं व्हिडीओत दिसून येतंय. ज्या शिताफीने स्टूलवर बसलेली बाई उठली आणि दुचाकीस्वार काउंटरच्या पलिकडे जाऊन कोसळतो, ते पाहता हे किती क्षणार्धात घडलं असावं, याची कल्पना येते. या दुर्घटनेत दुचाकीवरुन उडून पडलेल्या चालकालाच दुखापत झाली असण्याची शक्यता आहे. ही घटना सोमवारी रात्री तेलंगनातील खम्माम जिल्ह्यातील रावीचेत्तू बाजारात घडली आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ही दुचाकी जप्त केली असून या दुर्घटनेबाबत पुढील तपास सुरु आहे. दुचाकीचे ब्रेक्स फेल झाल्या कारणाने आपला ताबा सुटला असल्याचं चालकाने कबूल केलंय.

loading image
go to top