दिल्लीतून 13.50 कोटी रुपयांच्या नोटा जप्त

वृत्तसंस्था
रविवार, 11 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - दिल्ली पोलिस आणि प्राप्तीकर विभागाने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत एका वकिलाच्या कार्यालयात अंदाजे 13.50 कोटी रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत. त्यामध्ये 2.61 कोटी रुपयांच्या नव्या नोटांचाही समावेश आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीतील ग्रेटर कैलास परिसरातील रोहित टाऊन येथील "टी ऍण्ड टी लॉ फर्म'वर शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. "आमच्याकडे माहिती प्राप्त झाली होती. ती आम्ही प्राप्तीकर विभागाला दिली आणि संयुक्त कारवाई केली. आतापर्यंत आम्ही 10 कोटी रुपये जप्त केले आहेत. त्यापैकी 2 कोटीपेक्षा अधिक रकमेच्या नव्या नोटा आहेत. तर 7.5 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा आहेत.', अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त संजय शेरावत यांनी दिली. दरम्यान जप्त करण्यात आलेली रक्कम प्राप्तीकर विभागाच्या ताब्यात दिल्याचेही त्यांनी पुढे सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींना शिक्षा केली जाईल, असेही पोलिसांना पुढे सांगितले.

Web Title: Over 13 Crores Seized In Raid