भारतातील चारशे पक्षांनी एकदाही लढविली नाही निवडणूक!

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : भारतामध्ये नोंद असलेल्या 1900 पेक्षा अधिक राजकीय पक्षांपैकी तब्बल 400 पक्षांनी आतापर्यंत एकदाही कोणतीही निवडणूक लढविली नसल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी पक्ष स्थापन करण्यात येत असल्याची शंका मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी यांनी व्यक्त केली आहे.

जगात सर्वाधिक राजकीय पक्ष भारतामध्ये असल्याचेही जैदी यांनी यावेळी सांगितले. ज्या पक्षांनी निवडणूक लढविलेली नाही अशा पक्षांचे नाव पक्षांच्या यादीतून रद्द करण्याचा निवडणूक आयोग विचार करत आहे. नाव रद्द केल्यानंतर या पक्षांना दान आणि आर्थिक मदतीवरील प्राप्ती करामध्ये सवलत मिळणे बंद होईल. निवडणूक आयोग दरवर्षी पक्षांच्या यादीमध्ये कपात करत असते. आयोगाने प्रत्येक राज्यातील राज्य निवडणूक आयोगाकडून ज्या पक्षाने आतापर्यंत एकही निवडणूक लढविलेली नाही अशा पक्षांची माहिती मागवली आहे. आता नोंदणीकृत राजकीय पक्षांवर नजर ठेवणार असून अनियमितता आढळून येणाऱ्या पक्षांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Over 1,900 parties in India, 400 never fought polls: EC