ओडिसात आमदाराच्या गाडीने सात पोलिसांसह 22 जणांना उडवले

ही घटना शनिवारी खुर्दा जिल्ह्यातील बानापूर येथे घडली आहे.
ओडिसात आमदाराच्या गाडीने सात पोलिसांसह 22 जणांना उडवले

भुवनेश्वर : ओडिशा येथील बीजू जनता दलाच्या निलंबित आमदाराच्या गाडीने 22 जणांना चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत सात पोलिसांसह 22 जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी खुर्दा जिल्ह्यातील बानापूर येथे घडली आहे.

बीजू जनता दलाचे निलंबित आमदार प्रशांत जगदेव यांच्या कारने दिलेल्या धडकेत सात पोलिसांसह किमान 22 जण जखमी झाले आहेत. अचानक गाडी गर्दीत घुसल्याने घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. या घटनेत बाणापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक आरआर साहू यांच्यासह दोन जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना एम्स, भुवनेश्वर येथे नेण्यात आले आहे. या घटनेत बीजू जनता दलाचे सुमारे १५ कार्यकर्ते आणि सात पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com