मनाली-लेह महामार्गावर दरड कोसळून 2000 पेक्षा अधिक वाहनांचे नुकसान

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 जून 2018

''दरड पडल्याचे समजल्यानंतर आम्ही मोठी मशिनरी आणली. या मशिनरीच्या साहाय्याने परिसरातील दरड काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या भागात मोठ-मोठी दगडं पडत असल्याने वाहतूक पूर्ववत होण्यास अडचणी येत आहेत. पण पुढील काही तासांत परिसरातील दरड काढण्यात येईल आणि वाहतूक सुरळीत होईल''.   

- ए. के. अवस्थी, कमांडर

मनाली : मनाली-लेह महामार्गाच्या जवळील परिसरर मारही येथे गुरुवारी रात्री उशीरा दरड कोसळली. या परिसरात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत 2000 हून अधिक वाहनांचे नुकसान झाले. तर दरड कोसळल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. 

काल (गुरुवार) रात्री मनाली-लेह या महामार्गावर दरड कोसळली. मात्र, ही घटना आज (शुक्रवार) सकाळी समोर आली. ही घटना समोर आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने महामार्गावर पडलेले दरड काढण्याचे काम सुरु केले. याबाबत सीमा रस्ते बांधणी दलाचे कमांडर ए. के. अवस्थी यांनी सांगितले, की ''दरड पडल्याचे समजल्यानंतर आम्ही मोठी मशिनरी आणली. या मशिनरीच्या साहाय्याने परिसरातील दरड काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या भागात मोठ-मोठी दगडं पडत असल्याने वाहतूक पूर्ववत होण्यास अडचणी येत आहेत. मात्र, पुढील काही तासांत परिसरातील दरड काढण्यात येईल आणि वाहतूक सुरळीत होईल''.   

या परिसरातील तब्बल 2000 पेक्षा अधिक वाहनांचे नुकसान झाले असून, यामध्ये पर्यटक आणि लष्करातील वाहनांचा समावेश आहे. तसेच परिसरातील वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी आणखी 6 ते 8 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती मनालीचे पोलिस उपअधीक्षक शेरसिग यांनी दिली.

Web Title: Over 2000 vehicles stranded due to landslide on Manali Leh highway