२४ तासात २८ हजार रुग्ण तर मृत्यूंची संख्या पोहोचली...

Over 28000 Coronavirus Cases In India In last 24 Hours
Over 28000 Coronavirus Cases In India In last 24 Hours

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांमध्ये २८ हजार ७०१ नवे कोरोना रुग्ण मिळाले आहेत. कालच्या रुग्णांचा आकडा पकडून आता देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८ लाख ७८ हजार २५४ झाली होती. तर गेल्या २४ तासांत देशात एकूण ५०० कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशात आता मृतांचा आकडा एकूण २३ हजार १७४वर पोहोचला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, देशात आतापर्यंत एकूण ५.५ लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ही दिलासादायक बाब आहे. गेल्या २४ तासांत देशात एकूण १८ हजार ८५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३ टक्के असून १९ राज्यांमध्ये हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण राष्ट्रीय स्तरावर २.६४ टक्के आहे.
--------------
सचिन पायलट यांच्यासोबत किती आमदार? थेट व्हिडिओ प्रसिद्ध करत दिले उत्तर
--------------
अनेक देशांची चुकीच्या मार्गाने वाटचाल; जागतिक आरोग्य संघटना
--------------
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ६,४९७ कोरोना रुग्ण मिळाले आहेत. मागील दोन दिवसांच्या तुलनेत हा आकडा कमी आहे. कालच्या रुग्णांची संख्या मिळून आता भारतात एकूण रुग्णसंख्या २ लाख ६० हजार झाली आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाने आणखी १९३ जणांचा बळी घेतला असून राज्यात आता मृतांची एकूण संख्या १०,४८२ झाली आहे.

 

देशात उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत, कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त असून देशात सध्या महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. टाळेबंदीसारखे कठोर उपाय योजूनही राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर सातत्याने विविध राज्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ताज्या माहितीनुसार, रुग्ण वाढीची ही साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यांनी गरजेप्रमाणे स्थानिक पातळीवर पुन्हा लॉकडाउन करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, राज्यात पुणे आणि ठाण्यात पुन्हा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तर केरळमधील थिरुवअनंतपुरम तसेच संपूर्ण उत्तर प्रदेशात पुन्हा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com