'सर्जिकल'नंतर 300 पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचा भंग

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकव्याप्त काश्‍मिरमध्ये केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक' नंतर पाकिस्तानने तब्बल 300 पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचा भंग केल्याची माहिती शासकीय अधिकाऱ्यांनी दिल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.

शस्त्रसंधीचा भंग करताना सीमा सुरक्षा दलासह लष्कर पाकिस्तानच्या निशाण्यावर असून सीमावर्ती भागातील निष्पाप नागरिकांनाही पाकने बदला घेण्यासाठी लक्ष्य केले आहे. 29 सप्टेंबर रोजी झालेल्या "सर्जिकल स्ट्राईक'नंतर पाकिस्तानने तब्बल 300 पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचा भंग केला आहे. यापूर्वी 2015 साली पाकिस्तानने 405 वेळा शस्त्रसंधीचा भंग केला होता. तर यंदाच्या वर्षी केवळ जम्मूमध्येच पाकने 200 वेळा शस्त्रसंधीचा भंग केला आहे. भारताच्या सीमेत घुसणाऱ्या पाकिस्तानच्या लष्करासह दहशतवाद्याशी भारत लढा देत असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलातील एका अधिकाऱ्याने दिल्याचे वृत्तात म्हटले आहे. त्यासाठी पाकला गोळीबाराच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले जात असून सीमावर्ती भागातील स्थानिक नागरिकांना इतरत्र सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. तसेच सीमावर्ती भागातील 100 शाळाही बंद करण्यात आल्या आहेत.

Web Title: Over 300 Pak firings after Surgical Strike