नोटाबंदीमुळे 40 कोटी कामगार बाधित: आप

पीटीआय
शनिवार, 17 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशभरातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील 40 कोटी कामगार बाधित झाले अहेत, असा दावा आम आदमी पक्षाने केला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशभरातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील 40 कोटी कामगार बाधित झाले अहेत, असा दावा आम आदमी पक्षाने केला आहे.

आम आदमी पक्षाचे आमदार आदर्श शास्त्री यांनी याबाबत माहिती दिली. नोटाबंदीच्या निर्णयामुळे दिल्लीतील सरोजिनी नगर, करोलबाग येथील व्यवहार 70 ते 80 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे ते म्हणाले. तसेच, या निर्णयामुळे केवळ मोठ्या कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्यांना कमी करत असल्याचा दावाही त्यांनी केला. तर, आम आदमी पक्षाचे दिल्लीतील समन्वयक दिलीप पांडे यांनी नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी आल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "विकसित देशही नोटाबंदीचा निर्णय घेत नाहीत. मात्र, जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत मोदी यांनी गोंधळ निर्माण केला आहे.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, आम आदमी पक्ष, बहुजन समाज पक्ष, डावे, समाजवादी पक्ष यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे यंदाच्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गदारोळ झाला. परिणामी लोकसभेचा तब्बल 86 टक्के आणि राज्यसभेचा तब्बल 82 टक्के वेळ वाया गेला आहे. सोळाव्या लोकसभेतील गेल्या पंधरा वर्षांतील संसदीय अधिवेशनांच्या इतिहासातील यंदाचे अधिवेशन "बिनकामा'चे ठरले आहे.

Web Title: Over 40 crore workers affected by note ban: AAP