दत्तकांमध्ये लेकी ठरताहेत लाडक्‍या... 

 दत्तकांमध्ये लेकी ठरताहेत लाडक्‍या... 

नवी दिल्ली ः बालकांना दत्तक घेण्याच्या प्रमाणात 2018-19 या काळात वाढ झाल्याची माहिती "चाइल्ड ऍडॉप्टेशन रिसोर्स ऑथॉरिटी' (कारा) या संस्थेच्या अहवालात देण्यात आली आहे. दत्तक घेतल्या जाणाऱ्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण जास्त असल्याचे या अहवालात म्हटले असून, महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. 

"कारा'च्या माहितीनुसार, देशात 2018-19 या वर्षात देशात एकूण 4,027 बालके दत्तक घेण्यात आली. त्यामध्ये बालिकांची संख्या 2,398 एवढी आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये या आकडेवारीत वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. अहवालात दिलेल्या राज्यनिहाय आकडेवारीनुसार, बालके दत्तक घेण्यात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. बालक दत्तक देणाऱ्या सर्वाधिक संस्था महाराष्ट्रात असणे हे त्यामागचे एक कारण आहे. महाराष्ट्रात या काळात 477 बालिका दत्तक घेण्यात आल्या आहेत. 

भारतात 2015-16 मध्ये 3,677, 2016-17 मध्ये 3,788 आणि 2017-18 मध्ये 3,927 बालके दत्तक घेण्यात आली. 

मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण दरवर्षी वाढणे, हे नागरिकांची मानसिकता बदलत असल्याचे चांगले लक्षण असल्याची प्रतिक्रिया महिला व बालकल्याण विभागाच्या आधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

मायेचा हात... 
845 महाराष्ट्र 
281 कर्नाटक 
244 ओडिशा 
239 मध्य प्रदेश (आकडे 2018-19 चे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com