आसाममध्ये दीड कोटी रुपयांच्या नवीन नोटा जप्त

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

गुवाहटी- येथील एका व्यावसायिकाकडून दीड कोटी रुपयांच्या नवीन नोटा जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (मंगळवार) दिली.

अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बेलटोला भागात राहत असलेले व्यावसायिक हरजितसिंग बेदी यांच्या घरावर सोमवारी (ता. 12) सायंकाळी छापा टाकण्यात आला होता. यावेळी त्यांच्याघरातून 1,54,61,000 रुपयांच्या नवीन नोटा आढळून आल्या आहेत. विविध ठिकाणी त्यांनी नोटा लपवून ठेवल्या होत्या. यामध्ये दोन हजार व पाचशे रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. बेदी यांच्यासह रक्कम ताब्यात घेण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, बेदी हे काळा पैसा पांढरा करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरूनच त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Over Rs 1.5 cr in new currencies seized in Assam

टॅग्स