ओवैसी हे नवे जिना - संबित पात्रा 

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 जून 2018

आणीबाणीला अनुसरून बोलत असताना भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी ओवैसींवर टीका करताना म्हटले आहे की, ओवैसी हे 'नवे जिना' आहेत. मुस्लिमांना चेतावणी देण्याचे काम ते करून आपले हित साधून घेत असतात, असा आरोप त्यांनी केला. याला प्रत्युत्तर देताना ओवैसी यांनी पात्रा आणखी 'बच्चा' आहेत आपला सामना त्यांच्यासोबत नसून त्याच्या वडिलांसोबत आहे. 

हैद्राबाद - आणीबाणीला अनुसरून बोलत असताना भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी ओवैसींवर टीका करताना म्हटले आहे की, ओवैसी हे 'नवे जिना' आहेत. मुस्लिमांना चेतावणी देण्याचे काम ते करून आपले हित साधून घेत असतात, असा आरोप त्यांनी केला. याला प्रत्युत्तर देताना ओवैसी यांनी पात्रा आणखी 'बच्चा' आहेत आपला सामना त्यांच्यासोबत नसून त्याच्या वडिलांसोबत आहे. 

भारतीय जनता पक्षाकडून देशभरात आणीबाणीच्या विरोधात काळा दिवस पाळण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज काँग्रेसवर कडाडून टीका केली आहे. यातूनच एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांच्यात शाब्दिक संघर्षाला सुरवात झाली आहे. संबित पात्रांनी ओवैसींना 'जिना' असे संबोधले आहे, तर ओवैसींनी पात्रांना 'बच्चा' असे संबोधले आहे.

दरम्यान, आणीबाणीच्या काळात संपूर्ण देश तुरुंगशाळा करण्यात आली होती. त्यावेळी देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हे सगळे संविधानानुसार करण्यात आले होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) मुंबईत सांगितले. काँग्रेसमुळे न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Web Title: Owaisi is new jinah says sambit patra