राष्ट्रपती निवडणूक : ओवैसी म्हणाले, काँग्रेसमुळे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रपती निवडणूक : ओवैसी म्हणाले, काँग्रेसमुळे...

राष्ट्रपती निवडणूक : ओवैसी म्हणाले, काँग्रेसमुळे...

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांमध्ये फुट पडल्याचे पाहण्यास मिळत आहे. राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी (Presidential Poll) पश्मिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. मात्र, या बैठकीपूर्वी अनेक नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत असून, काँग्रसेसमुळे आपण बैठकीत सहभागी झालो नसल्याचे एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले आहे. (Asaduddin Owaisi Comment on Mamata Banerjee Presidential poll Meeting)

ओवैसी ममतांच्या सभेला का येणार नाहीत?

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) राष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भात विरोधी ऐक्य मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांनी बोलावलेल्या बैठकीकडे अनेक पक्षांनी पाठ फिरवली आहे. आम आदमी पार्टी आणि टीआरएसने या बैठकीत सहभागी होण्यास आधीच नकार दिला आहे. आता एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही या बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, 'मला बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेले नसून, आपल्याला आमंत्रण मिळाले तर बैठकीसाठी हजर राहणार नसल्याचे ओवैसी यांनी सांगितले. यामागचे प्रमुख कारण काँग्रेस असल्याचे ओवैसी यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: 'कोरोनामुळे स्मृती गेली'; पैशांचा जाब विचारताच मंत्र्याचं ईडीला उत्तर

तर, दुसरीकडे टीआरएसचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री चंद्रशेकर राव यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत अनेक तासांच्या विचारमंथनानंतर ममता बॅनर्जींच्या या बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने म्हटले आहे की, ते काँग्रेस आणि भाजपपासून समान अंतरावर राहू इच्छित आहेत. तसेच या बैठकीत काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित राहणार असल्याने उपस्थित राहता येणार नसल्याचे म्हटलेअसून, राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतरच या मुद्द्यावर विचार करणार असल्याचे आम आदमी पक्षाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Owaisi Not Invited To Mamatas Meeting Says Would Not Have Attended Because Of Congress

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top