मशीद पाडल्या प्रकरणातून ओवेसीची मुक्तता

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

हैदराबाद - मशीद पाडण्याच्या एका प्रकरणातून ऑल इंडिया मज्जित इ इत्तेहदुल मुस्लिमचा (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यासह पक्षाच्या चार जणांची तेलंगणाच्या न्यायालयाने आज मुक्तता केली. मुक्तता करण्यात आलेल्यांमध्ये ओवेसीच्या तीन भावांचा समावेश आहे.

संगारेड्डी शहराच्या न्यायालयाने हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी, त्यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी आणि अन्य चार आमदार अहमद पाशा काद्री, मुमताझ अहमद खान आणि मुझाम खान यांची न्यायालयाने मुक्तता केली. या पाच जणांनी 16 मार्च 2005 मध्ये रस्ता रुंदीकरणाच्या वेळी मशीद पाडण्यास विरोध करीत कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली होती. असदुद्दीन याने 21 जानेवारी 2013 मध्ये न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर न्यायालयाने त्याचे अजामीनपात्र वॉरंट रद्द केल्याने त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्यानंतर ओवेसी यांना जामीन मंजूर झाला होता.

Web Title: Owaisi release in a court case