गुलबर्ग सोसायटी दंगलीवरून ओवेसींची मोदींवर टीका

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर केलेल्या टिपणीमुळे एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मोदींवर टीका केली आहे. गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या गुलबर्ग सोसायटी दंगलीप्रकरणी ओवेसी यांनी मोदी यांच्या सहभागाबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत टीका केली आहे.

"डॉ. मनमोहनसिंग यांचा देशाच्या अर्थकारणावर प्रदीर्घ काळ दबदबा होता. त्यांच्या काळात इतके गैरव्यवहार झाले; पण डॉ. मनमोहनसिंग यांना एकही डाग लागला नाही. बाथरूममध्ये रेनकोट घालून स्नान करणे ही कला तर डॉक्‍टरसाहेबच जाणोत', अशी टीका मोदी यांनी बुधवारी केली. त्यावर ओवेसी यांनी ट्‌विटरद्वारे टीका केली आहे. 'जर माजी पंतप्रधान बाथरूममध्ये कोट घालून बसले आहेत तर गुजरामध्ये एहसान जाफ्री आणि इतरांची हत्या केली जात असताना, मोदी मुख्यमंत्रीपद धारण करून बसले होते', अशा शब्दांत त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

या सर्व प्रकारावर डॉ. मनमोहनसिंग यांनी मात्र मौन बाळगले असून मोदी यांच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

कोण होते एहसान जाफरी?
एहसान जाफरी हे कॉंग्रेसचे माजी खासदार होते. ते सहाव्या लोकसभेचे सदस्य होते. गुजरातमध्ये 2002 साली गुलबर्ग सोसायटी दंगलीमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.

Web Title: Owaisi slams Modi about Gulburg massacre