ओवैसींनी विचार करून बोलावे; वाटेकरूंना वाटा 1947मध्येच दिला: भंडारी

वृत्तसंस्था
रविवार, 2 जून 2019

देशात मुस्लीम भाडेकरू नव्हे तर वाटेकरी असे वक्तव्य करणारे एआयएमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी जर वाट्याची भाषा करायची असेल तर तो 1947 मध्येच दिला असल्याचे म्हटले आहे.

मुंबई - देशात मुस्लीम भाडेकरू नव्हे तर वाटेकरी असे वक्तव्य करणारे एआयएमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी जर वाट्याची भाषा करायची असेल तर तो 1947 मध्येच दिला असल्याचे म्हटले आहे.

भारतातील मुस्लीम देशाचा भाडेकरू नाही, वाटेकरी म्हणून राहणार आहेत असे ओवैसींनी म्हटले होते. त्याला उत्तर देताना भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी ओवेसींवर निशाना साधला असून ओवैसी यांनी विचार करून बोलावे, त्यांना कोणीही भाडेकरू म्हटलं नाही. तरीही ते वाट्याची भाषा करत असतील तर तो 1947मध्येच दिला असून तो विषय संपला आहे. असे भंडारी यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपने 300 जागा जिंकल्या असल्याने, मनमानी करू असे मोदींना वाटत असेल, तर तसे होणार नाही. मुस्लीम समाजाला धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार संविधानाने दिले आहे. जर मोदी हे मंदिरमध्ये जाऊ शकतात तर मुस्लीम व्यक्ती ही मस्जिदमध्ये जाऊ शकतात असे, ओवैसी म्हणाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On Owaisi Tenant Statement Bjp Leader Madhav Bhandari Said Had Been Given Share In 1947