राहुल गांधीचा खोटेपणा उघड- ओवेसी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

राहुल गांधीच्या काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळाले असले तरी, त्यांचा खोटेपणा तेलंगणाचा प्रयत्न तेलंगणाच्या जनतेने हाणून पाडला आहे. अशी टीका एमआयम पक्षाचे नेते असादुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. तेलंगणामध्ये पूर्णपणे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष अपयशी ठरले असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

हैद्राबाद- राहुल गांधीच्या काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळाले असले तरी, त्यांचा खोटेपणा तेलंगणाचा प्रयत्न तेलंगणाच्या जनतेने हाणून पाडला आहे. अशी टीका एमआयम पक्षाचे नेते असादुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. तेलंगणामध्ये पूर्णपणे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष अपयशी ठरले असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, बाकी राज्यामध्ये जरी काँग्रेस जिंकली असली तरी तेलंगणामध्ये काँग्रेस फेल झाली आहे. देशाला कांग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष नको आहेत. तसेच माझी व्होटबँक ही तेलंगणा किंवा हैद्राबाद नाहीत पूर्ण देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पूर्ण देशात एमआयएमचे चाहते असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

दरम्यान, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत असून या निवडणुकीत काँग्रेसची विजयाच्या दिशेने वाटचाल होताना दिसत आहे. तर भाजप पिछाडीवर असल्याची स्थिती आहे. 

Web Title: Owesi Criticized Rahul Gandhi