तेलंगणात निवडणूकीदरम्यान केला जातोय घुबडाचा वापर

वृत्तसंस्था
सोमवार, 3 डिसेंबर 2018

हैदराबाद : तेलंगणात निवडणूकीचे वारे जोरदार वाहत असून, काळी जादू म्हणून घुबडाचा वापर होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घुबड तस्करी करणाऱया 6 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'तेलंगणाच्या सीमाभागावर असलेल्या कलबुर्गी जिल्हातील सेदाम तालुक्यातून घुबड तस्करी करणाऱ्या 6 जणांना ताब्यात घेतले आहे. तेलंगणाच्या नेत्यांनी विरोधकांना पराभूत करण्यासाठी घुबड मागविल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली. सेदाममध्ये तस्करांकडून पकडण्यात आलेल्या घुबडाचा वापर काळी जादू करुन निवडणूक जिंकण्यासाठी करण्यात येणार होती. याबाबत पुढील तपास सुरू आहे.'

कर्नाटकमध्ये काळी जादू करण्यासाठी घुबड तस्करी केली जाते. या घुबडांची किंमत काही लाखांमध्ये आहे. तस्करांकडून तेलंगणात नेले जाणारे घुबड तीन ते चार लाख रुपयांपर्यंत विकले जाणार होते, अशी माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली आहे.

तेलंगणात विधानसभा निवडणुकांसाठी 7 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. प्रचारादरम्यान अनेकांनी आरोप-प्रत्यारोप केले आहेत. प्रचारादरम्यान लक्ष वेधून घेण्यासाठी विविध प्रकार करण्यात आले आहेत. मात्र, प्रचाराव्यतिरिक्त निवडणूक जिंकण्यासाठी घुबडाचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. तेलंगणामध्ये सध्या घुबडाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

Web Title: Owl allegedly used for black magic rescued in Hyderabad