Narendra Modi : OYO बॉस रितेश अग्रवालने PM मोदींना दिले लग्नाचे निमंत्रण ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

Narendra Modi : OYO बॉस रितेश अग्रवालने PM मोदींना दिले लग्नाचे निमंत्रण!

ऑनलाइन हॉटेल बुकिंग प्लॅटफॉर्म OYO चे संस्थापक आणि CEO आणि भारतातील सर्वात तरुण अब्जाधीशांपैकी एक असलेला रितेश अग्रवालने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. रितेश अग्रवाल यांनी मोदिंना लग्नाचे निमंत्रण दिले. रितेश अग्रवाल मार्चमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.

रितेश अग्रवालने नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीबद्दल सांगितले की, पंतप्रधानांनी त्यांचे खूप प्रेमाने त्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी ज्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले त्याचे शब्दात वर्णन करता येणार नाही. रितेशने ट्विट करून नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत माहिती दिली आहे.

रितेशने अग्रवाल म्हणाला, आम्ही एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज आहोत. तसेच त्यांनी आपला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. अग्रवाल म्हणाले, महिला सक्षमीकरणाच्या पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीने माझी आई प्रभावित झाली आहे. माझी आई उत्तर प्रदेशची आहे, ती नरेंद्र मोदी यांच्या महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनाने खूप प्रभावित आहे. 

रितेश अग्रवाल हा भारतातील तरुण उद्योगपती म्हणून खूप प्रसिद्ध आहे. तो नवीन स्टार्टअप्सना निधी देण्याचे काम करतो आणि तरुण उद्योजकांना त्यांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी टिप्स देतो. रितेशने २०१३ मध्ये ओयो रूम्सची स्थापना केली. यासाठी रितेशने भारतभर प्रवास केला तिथून त्याला ओयो स्थापन करण्याची कल्पना सुचली.

टॅग्स :Narendra Modi