Ritesh Agarwal : OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचा 20व्या मजल्यावरून पडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oyo founder Ritesh Agarwal father died after falling from buildings 20th floor in Gurgaon

Ritesh Agarwal : OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचा 20व्या मजल्यावरून पडून मृत्यू

Oyo Rooms चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले. गुरुग्राममधील एका उंच इमारतीवरून पडल्याने रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.दुपारी एक वाजताच्या सुमारास इमारतीच्या २०व्या मजल्यावरून पडल्याने रमेश अग्रवाल यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ते घराच्या बाल्कनीत होते आणि त्यानंतर तेथून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. यासोबतच ही घटना घडली त्यावेळी म्हणजेच रमेश हे घराच्या बाल्कनीतून पडले तेव्हा कुटुंबातील सदस्य घरात उपस्थित होते असे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

रितेश अग्रवालचे दोन दिवसांपूर्वी लग्न झाले होते आणि आता त्याच्या वडिलांच्या निधनाची बातमी आली आहे. आतापर्यंत ज्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते, तेथे या घटनेनंतर शोककळा पसरली आहे. रितेश अग्रवाल आणि गीतांशा यांचे लग्नाला दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, सॉफ्टबँकचे चेअरमन मासायोशी सोन यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.