...तर काँग्रेस कार्यकर्ते आत्महत्या करतील- पी. चिदंबरम

वृत्तसंस्था
रविवार, 26 मे 2019

माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाच्या पदावरून राजीनामा देऊ नये अशी विनंती केली आहे, त्यांनी असे केले तर दक्षिण भारतातील काँग्रेसचे कार्यकर्ते आत्महत्या करतील.

नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाच्या पदावरून राजीनामा देऊ नये अशी विनंती केली आहे, त्यांनी असे केले तर दक्षिण भारतातील काँग्रेसचे कार्यकर्ते आत्महत्या करतील. काल (ता.26) शनिवारी कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व वरिष्ठ पक्षांच्या नेत्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वबाबत आपला विश्वास व्यक्त केला आणि राहुल गांधी यांना या पदावर राहण्याची विनंती केली. मात्र राहुल गांधी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याविषयी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
 
काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांनी सर्वमताने राहुल गांधी यांचा राजीनामा देण्याचा आग्रह नाकारण्यात आला आहे. तसेच, राहुल यांच्या नेतृत्वाची कॉंग्रेसला आवश्यकता आहे, आणि पुढे चालू ठेवण्याची विनंती केली असल्याचे काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद म्हणाले आहेत. जर, एखादा नेता राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षाची भूमिका बजावू शकतो तर ते राहुल गांधी आहेत. असा दावा सुद्धा गुलाम नबी आझाद यांनी केला.

कॉंग्रेसच्या पराभवाला फक्त राहुल गांधी जबाबदार नाहीत. राहुल गांधी यांनी पदावर राहावं. विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. कॉंग्रेसमध्ये अंतर्गत बदल करण्याची गरज आहेत ते नेतृत्वाने करावे. माझ्यासह इतर राज्यातील प्रदेशाध्यक्षांनी सामुहिक राजीनामे द्यावेत. पराभवाचं खापर राहुल गांधी यांच्यावर फोडता कामा नये असं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: P Chidambaram appeals to Rahul Gandhi to not resign as Congress chief claims party workers in South India will commit suicide