नोटाबंदीबाबत माझे भाकीत खरे ठरल्याचे दुःख: चिदंबरम

वृत्तसंस्था
सोमवार, 18 जून 2018

नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान 
मी जे म्हणालो होतो ते खरे झाल्याचे दुःख मला वाटते आहे. माझे भाकीत खरे ठरले असले, तरी त्याचा मला आनंद झालेला नाही, कारण या नोटाबंदीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे, असे चिदंबरम म्हणाले. चिदंबरम यांनी लिहिलेल्या "स्पीकिंग ट्रूथ टू पॉवर' या पुस्तकाच्या तमीळ आवृत्तीचे प्रकाशन आज झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. 

चेन्नई : नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार असून, परिणामी विकासाचा दर दीड टक्‍क्‍याने खाली येऊ शकतो, असे मी केलेले भाकीत खरे ठरले असल्याचे मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज व्यक्त केले. नोटाबंदी करण्याचा निर्णय हा भारताच्या अर्थव्यवस्थेला 21व्या शतकात बसलेला सर्वांत मोठा तडाखा होता, अशी टीकाही चिदंबरम यांनी केली. 

नोटाबंदीसारखे भीषण संकट कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेवर ओढवले जाऊ नये. नोटाबंदीचा मोठा तडाखा देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. नोटाबंदी लागू केल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी लोकसभेत बोलताना मी म्हटले होते, की नोटाबंदीमुळे विकासदर दीड टक्‍क्‍याने खाली येऊ शकतो. मी केलेले हे भाकीत खरे ठरल्याचे सध्या दिसून येते आहे, असे चिदंबरम म्हणाले. 2015-16मध्ये विकासदर 8.2 टक्‍क्‍यांवर होता, तो नोटाबंदीच्या निर्णयामुळे 2017-18मध्ये 6.7 टक्‍क्‍यांवर आला आहे, असे चिदंबरम यांनी सांगितले. 

नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान 
मी जे म्हणालो होतो ते खरे झाल्याचे दुःख मला वाटते आहे. माझे भाकीत खरे ठरले असले, तरी त्याचा मला आनंद झालेला नाही, कारण या नोटाबंदीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे, असे चिदंबरम म्हणाले. चिदंबरम यांनी लिहिलेल्या "स्पीकिंग ट्रूथ टू पॉवर' या पुस्तकाच्या तमीळ आवृत्तीचे प्रकाशन आज झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. 

राजकीय अनियमितता व जातीभेद नष्ट करण्यासाठी आणि आर्थिक चुका दुरुस्त करण्यासाठी त्याविरोधात प्रत्येकाने आवाज उठविला पाहिजे आणि लिहिले पाहिजे. 
- पी. चिदंबरम, माजी केंद्रीय अर्थमंत्री 

आकडेवारी 
भारताचा विकासदर 

2015-16 : 8.2 टक्के 
2017-18 ; 6.7 टक्के 

Web Title: P Chidambaram criticize government on Note ban