'उत्तर प्रदेशच्या प्रभारींनी...', चिदंबरम यांचा प्रियंका गांधींवर निशाणा

P Chidambaram Criticized Priyanka Gandhi on UP Election Defeat
P Chidambaram Criticized Priyanka Gandhi on UP Election DefeatGoogle

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी अनेक प्रचार सभा घेतल्या. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत मिळालेल्या चार जागा सुद्धा त्यांना टिकवता आल्या नाहीत. त्यावरूनच काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P Chidambaram) यांनी प्रियंका गांधीवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. उत्तर प्रदेशात निवडणूक लढविणे आणि पक्षाची पुनर्बांधणी करणे ही दोन्ही कामे एकाचवेळी करू नका, असं पक्ष नेतृत्वाला सांगितलं होतं. पण, त्यांनी ऐकलं नाही, असं चिदंबरम म्हणाले.

P Chidambaram Criticized Priyanka Gandhi on UP Election Defeat
TMC अन् AAP च्या आघाडीत काँग्रेस लहान भावाची भूमिका स्वीकारणार : पी. चिदंबरम

गेल्या चार वर्षांपूर्वी तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी वाड्रा यांच्यावर उत्तर प्रदेशमध्ये पक्षाच्या पुनर्बांधणीची जबाबदारी सोपवली होती. पण, निवडणूक प्रचार आणि पक्षाची पुनर्बांधणी या दोन्ही गोष्टी एकाचवेळी करू असं त्या म्हणाल्या. पण, आधी पक्षाची पुनर्बांधणी करावी. त्यानंतर उत्तप्रदेशात निवडणूक लढवावी, असं त्यांना सांगितलं होतं. पण, त्यांनी ऐकलं नाही, असं चिदंबरम म्हणाले. गेल्या काही वर्षांपासून उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्षाची अवस्था गंभीर झाली हे सर्वांनाच माहिती आहे. पक्षाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत देखील काँग्रेसचा पराभव झाला. पण, त्यासाठी गांधी कुटुंबीयांना जबाबदार धरता येणार, असंही ते यावेळी म्हणाले. ते एनडीटीव्हीसोबत बोलत होते.

'उत्तर प्रदेशच्या प्रभारी लोकांनी...' -

उत्तर प्रदेशच्या प्रभारी लोकांनी एकाचवेळी दोन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. आधी पक्षाची पुनर्बांधणी करायला पाहिजे होती. त्यानंतर निवडणूक लढविणे गरजेचे होते. पण, दुर्दैवाने पक्षाची पुनर्बांधणी आणि निवडणूक एकाचवेळी झाली. काँग्रेसमध्ये अनेक कमतरता आहेत. मी त्यांच्या निदर्शनास आणू दिल्या आहे. कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांसारख्या नेत्यांनी काही कमतरता निदर्शनास आणून दिल्या आहेत, असंही चिदंबरम यांनी सांगितलं.

काँग्रेसमधील काही बंडखोर नेत्यांची सातत्याने बैठक सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. पण, पक्ष फुटू नये यासाठी चिदंबरम यांनी आवाहन केले आहे. प्रत्येकांनी आपआपल्या प्रदेशात जाऊन पक्षाची बांधणी करावी, असं आवाहन देखील चिदंबरम यांनी केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com