भाजपला खनिज तेलाचा स्रोत सापडला काय ? : पी. चिदंबरम

भाजपला खनिज तेलाचा स्रोत सापडला काय ? : पी. चिदंबरम

नवी दिल्ली : इंधनाच्या किमती लवकरच नियंत्रणात आणू, असा दावा करणाऱ्या भाजपला निश्‍चितच खनिज तेल फुकटात मिळविण्याचा मार्ग सापडला असेल, असा उपरोधिक टोला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज ट्विटरद्वारे लगावला. 

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर त्यावर आकारण्यात येणाऱ्या करांमध्ये कोणतीही कपात शक्‍य नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असून, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मात्र ही दरवाढ लवकरच नियंत्रणात आणू, असा दावा केला आहे. याचा चिदंबरम यांनी आज जोरदार समाचार घेतला. ""भाजपला असा स्रोत शोधायला हवा, की त्यातून फुकटात खनिज तेल मिळेल,'' असेही चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

काळ्या पैशाला आवर घालण्यात मोदी सरकारला अपयश आल्याचे नमूद करतानाच चिंदबरम यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी केलेल्या वक्तव्याकडे लक्ष वेधले. काळ्या पैशामुळे लोकशाहीला धोका असल्याचे रावत यांनी म्हटले आहे. सरकार म्हणतेय काळा पैसा संपला. मग हा पैसा कुठून येतोय, 2000 रुपयांच्या नवीन नोटेतून का, असा सवाल चिदंबरम यांनी या वेळी उपस्थित केला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com