सीमेवरील बासमतीचा हंगाम धोक्‍यात

वृत्तसंस्था
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

बेन-ग्लार्ड (सांबा) : आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळच्या भागात पिकणारा बासमती तांदूळ विशेष प्रसिद्ध आहे. या तांदुळाला एक वेगळाच वास असल्याने बाजारात याला चांगली किंमत मिळते; परंतु यंदा सीमारेषेवर सुरू असलेला तणाव आणि सुरू असलेला तोफांचा मारा यामुळे यंदाचा बासमतीचा हंगाम धोक्‍यात आल्याचे बोलले जात आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून ही परिस्थिती आहे, त्यातच काही दिवसांपासून प्रत्यक्ष सीमारेषेजवळून लोकांना हटविण्यात आले आहे. यामुळे पिके घ्यायची कशी असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे; काही शेतकरी तर केवळ बसूनच राहत असल्याचे चित्र आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएस पुरा पट्टा हा बासमतीसाठी प्रसिद्ध मानला जातो येथील सुमारे 17 हजार 742 हेक्‍टर एवढ्या जागेवर भातशेती होते; परंतु यंदा पाकिस्तानी रेंजर्सकडून होत असलेली गोळीबारी आणि उखळी तोफांचा मारा यामुळे हे सर्व क्षेत्र बाधित झाले आहे.
जम्मू आणि काश्‍मीरमधील भातशेतीवर सध्या पाकिस्तानची नजर असल्याचे मत कृषी विभागाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. कापणीस आलेली ही रोपे वेळेवर काढली नाहीत, तर या भाताचेही नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी जीव धोक्‍यात घालून भातकाढणीची कामे करत आहेत.

Web Title: paddy season in danger on border