पाकिस्तानमध्ये 'पद्मावत' कोणतेही दृश्‍य न वगळता होणार प्रदर्शित

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जानेवारी 2018

चित्रपटात दाखवलेल्या अलाउद्दीन खिल्जीच्या नकारात्मक भूमिकेला काहींचा विरोध होता. याबाबत पाकिस्तान सेन्सॉर बोर्डाचे माजी सदस्य मोबाशिर हसन म्हणाले की, सेन्सॉर बोर्ड कला आणि सर्जनशीलतेशी पक्षपात करत नाही

नवी दिल्ली - संजय लीला भन्साळी यांचा "पद्मावत' पाकिस्तानमध्ये कोणत्याही कटशिवाय प्रदर्शित होणार आहे. कोणतेही दृश्‍य न वगळता "पद्मावत' हा चित्रपट प्रदर्शित होण्यास योग्य आहे, अशी माहिती पाकिस्तान सेन्सॉर बोर्डाच्या सूत्रांनी दिली.

भारतात वादग्रस्त ठरलेल्या या चित्रपटाला पाकिस्तानमध्ये "यू' प्रमाणपत्र दिले आहे.
चित्रपटात दाखवलेल्या अलाउद्दीन खिल्जीच्या नकारात्मक भूमिकेला काहींचा विरोध होता. याबाबत पाकिस्तान सेन्सॉर बोर्डाचे माजी सदस्य मोबाशिर हसन म्हणाले की, सेन्सॉर बोर्ड कला आणि सर्जनशीलतेशी पक्षपात करत नाही.

चित्रपटाला प्रमाणित करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने इस्लामाबादच्या कैद- ए- आझम विद्यापीठातील इतिहास विभागाचे अध्यक्ष प्राध्यापक वकार अली शाह यांचेही सहकार्य घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: padmavat pakistan cinema