वाघा बॉर्डरवर परेडदरम्यान पाक क्रिकेटपटूचे माकडचाळे

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 एप्रिल 2018

पुणे : वाघा बॉर्डरवर परेडदरम्यान पाकिस्तानी सैनिकांसोबत क्रिकेटपटू हसन अली याने माकडचाळे केले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. तीव्र प्रतिक्रियांबरोबर सर्वच स्तरातून निधेष व्यक्त केला जात आहे.

पुणे : वाघा बॉर्डरवर परेडदरम्यान पाकिस्तानी सैनिकांसोबत क्रिकेटपटू हसन अली याने माकडचाळे केले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. तीव्र प्रतिक्रियांबरोबर सर्वच स्तरातून निधेष व्यक्त केला जात आहे.

वाघा बॉर्डरवर शनिवारी (ता. 21) संध्याकाळी फ्लॅग मार्च सुरु असताना पाकिस्तानी गोलंदाज हसन अली (वय 24) थेट पाकिस्तानच्या सैन्यात घुसला आणि भारतीय जवान व नागरिकांच्या बाजूने विचित्र पद्धतीने परेड करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार होत असताना पाकिस्तानच्या एकाही सैनिकाने हसनला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याला पाकिस्तानी अधिकाऱयांचा पाठिंबा असावा, असे व्हिडिओमधून दिसून येत आहे.

वाघा सीमेवर परेड सुरू असताना नियमानुसार फक्त लष्कराच्या जवानांनाच सहभागी होता येते. परेड सुरु असताना प्रेक्षक गॅलरीतून सामान्य नागरिक आपल्या भावना व्यक्त करु शकतात. परंतु, परेड सुरू असताना कोणीही मध्ये शिरून माकडचाळे करू शकत नाही. परेड सुरु होण्यापूर्वी किंवा संपल्यानंतर त्यांना अशाप्रकारचं कृत्य करता येऊ शकते. मात्र परेड सुरु असताना हसन अलीला हस्तक्षेप कसे करु दिले, असा सवाल भारतीय जवानांनी विचारला आहे.

दरम्यान, पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार सर्फराझ अहमदसोबत काही खेळाडू वाघा बॉर्डरवर आले होते. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी संघाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी हा दौरा आखण्यात आला होता, असे सांगण्यात येते. गेल्या वर्षी चॅम्पीयन ट्रॉफीतील अंतिम सामन्यात हसन अली याने भारताविरुद्ध खेळताना तीन गडी बाद केले होते. भारताचा या सामन्यामध्ये पराभव झाला होता. पाकिस्तानकडून खेळताना हसन अली याने 2 कसोटी सामन्यात 6 गडी बाद केले होते व 30 एकदिवसीय सामन्यात 62 गडी बाद केले आहेत. शिवाय, 16 टी-20 सामन्यात 21 गडी बाद केले आहेत. सामन्यादररम्यान खेळाडू बाद केल्यानंतर हसन अली मैदानावर जसा जल्लोष करतो, त्याचप्रमाणे माकड चाळे त्याने परेडदरम्यान केल्याच्या प्रतिक्रिया नेटिझन्सनी व्यक्त केल्या आहेत.

 

Web Title: Pak cricketer Hasan Ali trolled for mocking BSF at Wagah Border